News
नमाद महाविद्यालयात डॉ. एस.आर. रंगनाथन यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
Wednesday, 12 August 2026
Gallery
Tap the main image or a thumbnail to open the lightbox.
*नमाद महाविद्यालयात डॉ. एस.आर. रंगनाथन यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन*
गोंदिया शिक्षण संस्था संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आले. डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात भरविण्यात आलेल्या भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांनी ग्रंथालयाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करून आपल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. सुनिल जाधव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी भारतीय ग्रंथशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जीवनपटावर आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे महत्त्व सांगत, ते आधुनिक ग्रंथालयाचे जनक कसे आहेत, याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुयोग इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश उदापुरे यांनी मानले.
या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सरिता उदापूरकर, डॉ. एच.पी. पारधी, डॉ. संतोष होतचंदानी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. अंबादास बाकरे, डॉ. प्रियादर्शन नंदेश्वर, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. प्रवीण कुमार, प्रा. सौरभ चेटूले, प्रा. रवी रहांगडाले, डॉ. घनश्याम गेडेकर, डॉ. कपिल चव्हाण, डॉ. शशिकांत कडु, प्रा. तारेन्द्र पटले तसेच श्री. मनोज पटले, श्री. तुषार लिचडे, श्री. अनिल मेंढे, श्री. योगेश निकम, श्री. राजेश गुरव, श्री. एम.एस. देशभ्रतार आणि श्री. लिकेश दहीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.