Accredited by NAAC
Natwarlal Maniklal Dalal College

News

न.मा.द. महाविद्यालयात 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांची नशामुक्तीची प्रतिज्ञा

Thursday, 13 August 2026

Gallery

Tap the main image or a thumbnail to open the lightbox.

न.मा.द. महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवार, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत एक विशेष कार्यशाळा आणि प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राधेश्यामजी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावून सांगितली. तरुणाईने व्यसनांपासून दूर राहून आपले आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधीही व्यसन न करण्याची आणि इतरांनाही व्यसनामुक्त करण्यासाठी प्रवृत्त करण्याची सामूहिक शपथ घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांनी आपल्या अध्यक्षाक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजण्यास मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

← All news & events

Admissions & enquiries

We’re here to help you take the next step.