Accredited by NAAC
Natwarlal Maniklal Dalal College

News

रॅगिंगमुक्त महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प

Friday, 14 August 2026

Gallery

Tap the main image or a thumbnail to open the lightbox.

गोंदिया : गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, गोंदिया येथे Anti-Ragging Awareness Program ची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करणे तसेच महाविद्यालयात सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी रॅगिंगसारखे कृत्य करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे सांगितले. रॅगिंगमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच अशा प्रकारच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि करिअर धोक्यात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी परस्परांमध्ये स्नेह, आदर आणि बंधुभाव वाढवून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अॅड. मीना भोवते यांनी रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंगमुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, मानसिक व सामाजिक नुकसान तसेच रॅगिंगनंतर विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रॅगिंग ही केवळ क्षणिक गंमत नसून त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या संपूर्ण भवितव्यावर होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या प्रमुख वक्त्या अॅड. एकता गणवीर यांनी रॅगिंगविरोधी कायद्याच्या विविध तरतुदी, रॅगिंग करणाऱ्या व्यक्तींवर होणारी कायदेशीर कारवाई व शिक्षेच्या तरतुदी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच कायद्याअंतर्गत पीडित विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा, संरक्षण आणि मदतीच्या उपाययोजनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँटी-रॅगिंग कमिटीचे प्रभारी प्रा. डॉ. उमेश उदापूरे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी रॅगिंगला विरोध करून महाविद्यालयीन जीवनात परस्पर सन्मान आणि मैत्रीची संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अंकेश रामटेके व वृषाली भाजीपाले यांनी केले, तर रोहन रंगारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला अँटी-रॅगिंग कमिटीचे प्रभारी डॉ. उमेश उदापूरे, सदस्य व एमबीए विभागप्रमुख डॉ. गिरीश कुदळे, सदस्य गणेशन राव, कला विभागप्रमुख डॉ. एच. पी. पारधी, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सरिता उदापूरकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख नंदेश्वर मॅडम, डॉ. किशोर वासनिक, ग्रंथालय प्रमुख डॉ. सुनील जाधव, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. बबन मेश्राम, डॉ. शशिकांत चौरे, मुन्ना राणा तसेच कला व वाणिज्य विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः जुबेर खा पठाण, भूषण बोंबर्डे व नितेश आगासे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या Selfie Stand वर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सेल्फी घेतले. विद्यार्थ्यांनी हे फोटो आपल्या WhatsApp ग्रुपवरही शेअर करून Anti-Ragging Awareness चा संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या माध्यमातून “रॅगिंग नाही—मैत्री हवी, अपमान नाही—सन्मान हवा, भीती नाही—विश्वास हवा” हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी रॅगिंग करणार नाही, रॅगिंगला प्रोत्साहन देणार नाही आणि रॅगिंगची घटना घडल्यास त्याकडे दुर्लक्ष करणार नाही, असा संकल्प केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा Anti-Ragging, Awareness Program यशस्वी आणि प्रभावी ठरला.

← All news & events

Admissions & enquiries

We’re here to help you take the next step.